मुंबई – करोना व्हायरसमुळे लॉकडाऊनदरम्यान दूरदर्शनवर जुन्या मालिकांचे पुर्नप्रसारण करण्यात येत आहे. यात “रामायण’ या धार्मिक मालिकेने पुन्हा आपली क्रेझ कायम असल्याचे दाखवून दिले आहे. लॉकडाऊन वेळी सोशल मीडियावर लोक “रामायण’ पाहिल्यानंतर त्यांचे जुने दिवस आठवत आहेत. तर “रामायण” मधील दीपिका चिखलिया (सीता) या सुद्धा इंस्टाग्रामवर या मालिकेतील किस्से आपल्या फॅन्सना शेअर करत आहे.
View this post on Instagram
#sarojini#sarojininaudu …..1st look #poster……#starplus #ramayan #730 #everyday
यातच तिने तिच्या अपकमिंग प्रोजेक्टबाबत इंस्टाग्रामच्या माध्यमातून माहिती दिली आहे. दीपिकाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे की,’ स्वतंत्रता की नायिका की एक अनकही कहानी.” यासोबतच तिने या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री श्रीमती सरोजिनी नायडू यांच्या बॉयोपिकचे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर धीरज मिश्रा आहे सध्या सोशल मीडियावर या पोस्टरला चांगलीच पसंती मिळत असून दीपिका चिलखलिया या चित्रपटातील लुकला चांगलीच पसंती मिळत आहे.