मुंबई – बीसीसीआयने पुढील मोसमात होत असलेल्या आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव येत्या डिसेंबरमध्ये होणार असल्याचे जाहिर केले आहे. तसेच स्पर्धेतील सहभागी संघांना यंदा त्यांच्या पॉकेटमध्ये जादा रकमेचीही तरतुद केली जाणार आहे. ही तरतुद गेल्या मोसमात 90 कोटी होती, तर यंदा 95 कोटी रुपये करण्यात येणार आहेत.
पुढील वर्षीपासून आयपीएल स्पर्धा मुळ रचनेतच होणार असून येत्या 16 डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव बंगळुरुत होणार आहे. (IPL 2023 auction is set to be held on December 16 in Bengaluru) 2020 सालापासून करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा छोट्या रचनेत व मिनी लिलावानूसार खेळवली गेली होती.
#T20WorldCup | स्पर्धेत ICC कडून काही नियमांत पुन्हा बदल, सामन्यात पाऊस पडला तर….
तसेच 2021 साली स्पर्धा भारतात सुरु झाली परंतू काही संघातील खेळाडूंना करोनाची बाधा झाल्यामुळे स्पर्धेचे दुसरे सत्र अमिरातीत खेळवले गेले. यंदाची स्पर्धा मात्र, करोनाचा धोका संपूष्टात आल्यामुळे भारतातच खेळवली गेली होती. पुढील वर्षापासून ही स्पर्धा मुळ रचनेनूसार होम व अवे याच धर्तिवर खेळवली जाणार आहे.