बारामती – बारामतीने फक्त देशाच्या राजकारणात छाप पाडली नाही तर पंढरीत संस्कारांची शिदोरी देखील दिली जाते. त्यामुळेच लाखो रुपयांचे सामाजिक कार्य करणाऱ्या सिद्धिविनायक फौउंडेशनसारख्या संस्था बारामतीत उभ्या राहतात. गणेश जोजारे यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते निर्माण होतात, असे मत पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंगेस अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केले.
सुपे येथील प्राजक्ता मतिमंद विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरवर्षी गोरगरिब जनतेला लाखो रुपयांची मदत करणाऱ्या बारामतीच्या सिद्धिविनायकचे सदस्य व मित्रमंडळ अध्यक्ष गणेश जोजारे यांनी फौउंडेशनच्या मित्राना मतिमंद शाळेत वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली.
यावेळी सदस्य श्रीकांत झोरे, परशुराम वाकळे, संजय धुमाळ, दत्तात्रय धायगुडे, संतोष सातव, ऍड. गणेश आळंदीकर, ऍड. राम सूर्यवंशी, सर्वधर्मसमभाव संघटनेचे अध्यक्ष जमीर इनामदार, प्रतीक शेठ जोजारे आदी सदस्य व मित्रांनी गणवेश, पादत्राणे व खाऊ वाटप करून हा वाढदिवस साजरा केला.
यावेळी शाळेला येणाऱ्या अडचणीचे निवारण आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगून करु, असे आश्वासन गारटकर यांनी दिले. जयराम सुपेकर यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापक भुजबळ यांनी आभार मानले. सूत्रसंचालन ऍड. राम सूर्यवंशी यांनी केले.
यावेळी बारामतीतील सिद्धिविनायक फौउंडेशन व सर्वधर्मसमभाव संघटनेचे 35 कार्यकर्ते हजर होते. बारामती ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर तावरे, अशोक वेदपाठक, सचिन पवार, दीपक कापऱे, सौरव आडाणे, शशिकांत माळवे आदी मान्यवर
उपस्थित होते.