बारामती- तालुक्यात दिवसभरात १७ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बारामतीकरांची चिंता वाढली आहे. बारामती मध्ये एकूण 96 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी प्रतीक्षेत असलेल्या उर्वरित 13 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये 11 जणांचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे
आज दिवसभरामध्ये सकाळच्या वेळी सहा व आत्ताचे 11 असे एकूण सतरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत, पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामध्ये ग्रामीण भागातील 8 व बारामती शहरातील नऊ असे रुग्ण आहेत व बारामतीची रुग्ण संख्या एकूण 165 झालेले आहे.
दरम्यान, या वाढच्या रुग्णांमुळे बारामतीत भीतीचे वातावरण पसरले आहे.