बारामती – बारामती बाजार समितीने भुसार, फळे व भाजीपाला, जनावरे बाजार, चिंच व रेशीम मार्केट यापासुन मिळणा-या उत्पन्ना व्यतिरिक्त पेट्रोल पंपाची उभारणी करून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे. बारामती बाजार समितीचे चार पेट्रोल व डिझेल पंप व दोन सीएनजी पंप आहेत. त्यामुळे समित्यांनी फक्त मार्केट फी वर अवलंबुन न राहता असे वेगवेगळे उपक्रम व सुविधा राबवुन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले पाहिजेत. बारामती बाजार समिती शेतक-यांसाठी नेहमी उत्तम काम करत असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती उंडवडी कप येथील पेट्रोल पंपाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभहस्ते व श्री सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांचे अध्यक्षतेखाली रविवार दि. (२१) रोजी संपन्न झाले . यावेळी कार्यक्रमात पवार बोलत होते.
बारामती बाजार समितीच्या ८८ वर्षाच्या कारकिर्दीत बारामती मुख्य बाजार आवार तसेच सुपे व जळोची उपबाजार असा विस्तार झाला आहे. समितीने बाजार आवारात शेतकरी व व्यापा-यांसाठी यांत्रिक चाळणी, वजनकाटा, मॅग्नेट प्रकल्प, निर्यात केंद्र, सुपे येथे नवीन उपबाजार आवार असे विविध सुविधा व उपक्रम राबविलेले आहेत. समितीने बारामती मुख्य यार्ड येथे रेशीम कोष मार्केट सुरू केले असल्याने शेतक-यांनी याची माहिती घेऊन तुती लागवड करावी. सध्या कोषांचे लिलाव हे ऑनलाईन होत असल्याने देशातील रिलर्स यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे शेतक-यांना दर चांगला मिळत आहे.
बाजार समितीने उंडवडी कप येथील श्री भैरवनाथ शिक्षण मंडळाची जागा भाडे तत्वावर घेऊन एचपी कंपनीचा ए टाईप पेट्रोल पंपाची उभारणी केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची सोय झाली आहे. ग्राहकांना शुद्ध पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. यामुळे परिसरातील मुलांना रोजगार उपलब्ध झाला आसल्याचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले
यावेळी बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, विश्वास देवकाते, दत्तात्रय येळे , सचिन सातव , विक्रम भोसले, पोपटराव गावडे, सुशांत जगताप, भरत खैरे, प्रतापराव पागळे, वसंतराव घनवट, सरपंच रूपाली जराड, समीर बनकर, अशोकराव साळुंके, अनिल हिवरकर, संपतराव जगताप, प्रकाश तावरे, समितीचे सदस्य दत्तात्रय तावरे, विनायक गावडे, युवराज देवकाते, विश्वास आटोळे, सतिश जगताप, बापुराव कोकरे, प्रतिभा परकाळे, शोभा कदम, शुभम ठोंबरे, विशाल भोंडवे, अरूण सकट, संतोष आटोळे, नितीन सरक, सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे, सईद बागवान, सुभाष चांदगुडे इत्यादी मान्यंवर उपस्थित होते. आभार उपसभापती निलेश लडकत यांनी मानले.
सुपे नवीन उपबाजार येथे शेतकरी व व्यापा-यांसाठी विविध सुविधा व उपक्रम राबविणेत येणार आहेत. सुपे व परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड व उत्पादन होत असल्याने त्याचा विचार करता नवीन उपबाजार आवारात स्वतंत्र कांदा मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे. कांदा मार्केट हब करणेचा समितीचा मानस आहे. यामुळे परिसरातील शेतक-यांना याचा फायदा होणार आहे. विविध सुविधा व दुरगामी प्रकल्प राबविणेस बारामती बाजार समिती सतत कटिबद्ध राहील.
– सुनिल पवार,सभापती -बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती