पुणे : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी दै. ‘प्रभात’ने यंदा ‘माणिकचंद’ प्रस्तुत ‘प्रभात ग्रीन गणेशा-2019’ ही शाडूच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा दि. 30 ऑगस्टपर्यंत घेण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कार्यशाळा पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांनी मनावर अधिराज्य करणाऱ्या बाप्पाला मूर्त स्वरूप दिले. या मुर्त्या तयार करताना त्यांची एकाग्रता ही सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली…