पुणे – भारतीय महिला ज्युनियर हॉकी संघातील तीन होतकरू खेळाडूंचा व त्यांच्या प्रशिक्षकांचा बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकी संचालक ए. एस. राजीव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वैष्णवी फाळके, ऋतुजा पिसाळ व अक्षता ढेकळे ह्या तिन्ही सत्कारार्थी फलटणच्या आहेत.
सरव्यवस्थापक व्ही. पी. श्रीवास्तव, प्रशांत खटावकर, उन्नाम आर. राय, संजय रुद्रा, आर. एस. बन्सल व अरुण कबाड़े यांच्यासह प्रशिक्षक अजित लाक्रा आणि हॉकी महाराष्ट्रचे सचिव मनोज भोरे उपस्थित होते.