Indian crows in Kenya : किमान 10 लाख भारतीय कावळ्यांना मारण्याचा केनियाचा निर्णय, पुढे आलं ‘हे’ कारण…

नैरोबी – केनियातील सरकारने मूळ भारतातून आलेल्या कावळ्यांना मोठ्या संख्येने मारण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सहा महिन्यांत किमान १० लाख कावळे मारण्याची योजना सरकारने तयार केली आहे. कावळे आमच्या प्राथमिक परिस्थितीकीचा भाग नसल्याचे तेथील वन्यजीव विभागाने म्हटले आहे तसेच भारतीय मूळ असलेल्या कावळ्यांना त्यांनी आक्रमक पक्षही ठरवले आहे. हे कावळे अनेक दशकांपासून केनियातील जनतेला त्रासदायक ठरत असून त्यांनी स्थानिक पक्ष्यांनाही मारले असल्याचा दावा वन विभागाने केला आहे.
केनियाच्या वन्यजीव प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या देशांत आलेले हे कावळे पूर्व आफ्रिकेतील नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांत तटवर्ती भागांतील मोम्बासा, मालिंदी, किलिफी आणि वाटमू या शहरांमध्ये कावळ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींच्या पाश्र्वभूमीवर १० लाख कावळ्यांना मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेल उद्योगाचे प्रतिनिधी आणि कावळे नियंत्रण क्षेत्रातील तज्ज्ञ चिकित्सकांच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला.
G7 Summit 2024 : जी-7 देणार भारत-मध्यपूर्व-युरोप कॉरिडॉरला प्रोत्साहन…
प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार कावळे तटवर्ती भागातील शहरांमधील हॉटेला व्यवसायासाठी डोकेदुखी ठरले आहेत. कावळ्यांमुळे पर्यटकांना उघड्या जागेत भोजनाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक त्रस्त झाले असून त्यांनी कावळ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.





