मुंबई – आयपीएलच्या या हंगामात एक नवीन चॅम्पियन पाहावयास मिळणार आहे. या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू निश्चितपणे प्लेऑफमध्ये प्रवेश करेल, असा विश्वास भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्री यांनी व्यक्त केला आहे. रवी शास्री म्हणाले, ही स्पर्धा जशी-जशी पुढे जात आहे, तशी-तशी रोमांचक होणार आहे.
विशेषताः बेंगळुरूचा नवीन कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करेल. या मोसमात विराट कोहली आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची आशाही त्यांनी बोलून दाखविली. विराट चांगली कामगिरी करत असून ग्लेन मॅक्सवेलही संघात परतला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, तीन सामन्यांची विजयी मालिका शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रोखली होती.