पुणे – बाणेर-बालेवाडी भागात समान पाणी योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी आवश्यकस असलेल्या ट्रान्समिशन जलवाहिन्यांची कामे काही भागात अपूर्ण अवस्थेत आहेत ही कामे तातडीनं पूर्ण करण्याचे पत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेस दिले आहेत. याबाबत भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या कामाच्या सदस्थितीची माहिती पालकमंत्री पाटील यांना पत्राद्वारे कळविली होती. त्याची गंभीर दखल घेत महापालिकेस याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
पत्रानुसार बाणेर-बालेवाडी- -पाषाण भागामध्ये समान पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बाणेर-बालेवाडी-पाषाण भागातील 8 पैकी 6 टाक्यांचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्या देखील सुरु करण्यात येतील. परंतु या टाक्यांना ट्रान्समिशन लाईन मधून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्या लाईनचे काम आपण केलेल्या सूचनेनुसार पुन्हा सुरु करण्यात आलेले आहे.
वारजे ते बाणेर-बालेवाडी पर्यंतच्या भागामध्ये या ट्रान्स्मिशन लाईनचे काम अनेक ठिका अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. तसेच या टाक्यांच्या अंतिम टप्प्यामधील काही कामे देखील प्रलंबित आहेत. या कामांबाबत आपण स्वतः लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची मागणी बालवडकर यांनी पालकमंत्री पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार सदर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याकरिता आपण संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाय योजना करण्यास सांगावे असे आदेश पालकमंत्री पाटील यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहेत.
1. डुक्कर खिंड वारजे महामार्ग परवानगीसाठी 250 मीटर जलवाहीनीचे काम प्रलंबित
2. वारजे येथे 36 मीटर जलवाहीनीचे काम प्रलंबित
3. चांदणी चौक येथे एका खासगी जागेतून जाणाऱ्या 60 मीटर काम प्रलंबित
4. एचइएमआरएल रामनदीवरील स्ट्रक्चरल स्टील ब्रीज मुळे ट्रान्समिशन लाईन प्रलंबित
5. पाषाण तलाव येथ स्ट्रक्चरल स्टील ब्रीज 40 मीटर काम प्रलंबित
6. सुस खिंड ते कुमार पेपीलोन सोसायटी पर्यंतचे सुमारे 800 काम पाईप नसल्याने प्रलंबित
7. सुतारवाडी गावठाण येथे सुमारे 150मीटर चे काम अरुंद रस्त्यामुळे प्रलंबित.
8. सुस खिंड पूल ते किया शोरूम (बीटवाईज चौक बाणेर) 874 तसेच किया शोरूम (बीटवाईज चौक बाणेर) ते बालेवाडी डेपो पर्यंतच्या कामातील 1230 मीटर जलवाहीनी टाकण्याचे काम प्रलंबित