Bangladesh vs Srilanka 3rd ODI : बांगलादेशने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा 2-1 असा पराभव केला. बांगलादेशने मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 4 विकेटने जिंकला. हा सामना सोमवारी चितगाव येथे झाला. बांगलादेशने मालिका जिंकली पण त्यांना मोठ्या नुकसानीला समोरं जावं लागलं.
याच सामन्यात संघाचे चार खेळाडू दुखापतग्रस्त झाले. वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान, अनामूल हक, झाकीर अली आणि सौम्य सरकार जखमी (दुखापतग्रस्त) झाले आहेत. दोन खेळाडूंच्या दुखापती इतक्या गंभीर होत्या की त्यांना स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावं लागले.
वास्तविक, वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. यादरम्यान मुस्तफिजुर रहमान आणि झाकीर अली गंभीर जखमी झाले. या दोन्ही खेळाडूंना स्ट्रेचरवरून बाहेर न्यावं लागले. श्रीलंकेच्या डावात मुस्तफिजुर रहमान 48 वे षटक टाकत होता. या षटकाचा पहिला चेंडू टाकल्यानंतर तो अडचणीत दिसला. त्यांची प्रकृती इतकी बिघडली की त्याला उठताही येत नव्हते. यानंतर त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावं लागले.
Mustafizur Rahman goes back in a stretcher after getting body cramps. He looks in bad shape currently. pic.twitter.com/Ufmn9tIRX0
— 𝐒𝐞𝐫𝐠𝐢𝐨 (@SergioCSKK) March 18, 2024
बांगलादेश-श्रीलंका सामन्यातील एक मोठी घटना 50 व्या षटकात घडली. बांगलादेशसाठी तस्किन अहमद श्रीलंकेच्या डावातील शेवटचे षटक टाकत होता. प्रमोदने त्याच्या षटकातील पाचव्या चेंडूवर एक शॉट खेळला. चेंडू हवेत होता. हे पाहून अनामूल आणि झाकीर दोघेही चेंडूकडे धावले.
यावेळी दोघांमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये अनामूलने हा झेल घेतला, मात्र झाकीर गंभीर जखमी झाला. त्याला थेट स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावं लागले.
या सामन्यादरम्यान बांगलादेशचा खेळाडू सौम्य सरकारलाही दुखापत झाली आहे. चेंडू रोखण्याचा प्रयत्न करत असतानाच तो जाहिरात फलकावर आदळला. त्यांच्या मानेला बोर्ड लागून दुखापत झाली. अशा प्रकारे बांगलादेशचे एकूण चार खेळाडू जखमी झाले.
WPL 2024 : चॅम्पियन आरसीबीवर पडला पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
दरम्यान, तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने 235 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं 40.2 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. त्यांनी हा सामना 4 विकेटने जिंकला तर मालिका 2-1 ने खिशात घातली.