नवी दिल्ली – भारताचा अव्वल बास्केटबॉलपटू सतनामसिंग भामरा याच्यावर राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवनविरोधी समितीने (नाडा) दोन वर्षांची बंदी घातली आहे. अमेरिकेतील एनबीए या अत्यंत मानाच्या समजल्या जात असलेल्या स्पर्धेत उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी तो दोषी आढळला आहे.
गेल्या वर्षी उत्तेजक चाचणीत भामरा दोषी ठरला होता. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून त्याच्यावर तात्पुरती बंदी लादण्यात आली होती. या कालावधीत त्याला स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही, तसेच त्याला प्रशिक्षक, सल्लागार असे कोणतेही काम करता येणार नाही, असेही समितीने स्पष्ट केले आहे.