कोल्हापूर/प्रतिनिधी– मुख्यमंत्र्यांनी आरशासमोर उभं राहावं त्यांना पुढील विरोधी पक्षनेता दिसेल असा खोचक प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिलय. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. आगामी निवडणुका मित्रपक्षांना घेऊनच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं असून वंचित बहुजन आघाडी बरोबर अजूनही चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
काँग्रेस कमिटीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन व कार्यकर्ता मेळावा आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा असेल असं वक्तव्य आज केलं होतं याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांची भविष्यवाणी नेहमीच चुकीची ठरली आहे असे सांगत त्यांनी आरशासमोर उभ रहावं त्यांना पुढील विरोधी पक्षनेता दिसेल असा खोचक प्रत्युत्तर दिलय.
विधानसभा निवडणुका काँग्रेस मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार असून वंचित बहुजन आघाडीशी ही अजून चर्चा सुरु असल्याचा दावा थोरात यांनी केलाय.विधान परिषद आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत त्यांना विचारले असता याबाबतचा निर्णय स्क्रिनिंग कमिटी घेईल असे सांगतानाच विधान परिषदेतील संख्याबळ टिकूनही आमच्यासाठी महत्त्वाचं असल्याचं थोरात यांनी म्हटलंय.