Bala Nandgaonkar | Raj Thackeray । Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. उद्या गुरूवार 28 मार्च रोजी महायुतीच्या जागावाटपाचे चित्र स्पष्ट होणार आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचा घटक पक्ष असणार की नाही? हे देखील उद्याच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अवघ्या काही तासाभरात मनसे पक्ष लोकसभेची लढाई स्वतंत्र लढणार की महायुतीत सहभागी होणार हे स्पष्ट होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. । Bala Nandgaonkar | Raj Thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेच्या नेतेमंडळी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत गुढीपाडव्याच्या सभेबाबत चर्चा झाल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
तसेच, मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत आम्ही 3 जागा मागितल्या आहेत. त्यातील दोन जागांसाठी चर्चा सुरु आहे. महायुतीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात पक्षप्रमुख ठरवतील, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.
याशिवाय आजची आमची बैठक फक्त गुढीपाडवा मेळाव्यासंदर्भात होती. जी माहिती तुम्हाला हवी, त्यासाठी तुम्ही थोडी प्रतिक्षा करा. राजकारणात ज्याच्याकडे संयम आहे, तो पुढे जातो. दोन-चार दिवसांत या प्रश्नांची उत्तर मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले. । Bala Nandgaonkar | Raj Thackeray