तंत्रज्ञानाला बदनाम करून भीती पसरवण्याचा प्रयत्न : मोदी

नवी दिल्ली : तंत्रज्ञानाला बदनाम करण्याच्या प्रयत्नांपासून सावध रहा. त्याद्वारे भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा इशारा पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी दिला.

पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी झालेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभात मोदी बोलत होते. ते म्हणाले, तंत्रज्ञानाला बदनाम करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी काही क्रियाशील आहेत. विशेषत: भारताच्या दृष्टीकोनातून तंत्रज्ञान हे लोकांच्या विरोधातील आहे, असे भासवण्याचा प्रयत्न होत आहे. कृत्रीम बुध्दीमत्तेचे धोके किंवा यंत्रमानव मानवापेक्षा कधी अधिक कार्यप्रवण होईल यावर वाद विवाद अपेक्षित नसून मानवी हेतू किंवा ध्येय आणि कृत्रिम बुध्दीमत्ता यांच्यात कसा पुल उभारता येईल यावर चर्चा व्हायला हवी, असे ते म्हणाले.

तंत्रज्ञान हा सेतू आहे, तो विभाजक नाही यावर पंतप्रधांनी आपल्या भाषणात भर दिला. सब का साथ सब का विकास हे साध्य करण्यासाठी ध्येयासक्ती आणि ध्येयपुर्ती, मागणी आणि पुरवठा, सरकार आणि प्रशासन यांच्यात तंत्रज्ञान हा सेतु आहे, असे ते म्हणाले.

टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन आणि मुख्य अर्थतज्ज्ञ रुपा पुरषोत्तमन यांनी लिहलेल्या ब्रिजिटल इंडिया या पुस्तकाचे प्रकाशन पंतपधानांच्या हस्ते झाले. यावेळी टाटा सन्सचषे भाग्यविधाते रतन टाटा उपस्थित होते. तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचे संधीत रूपांतर करायला हवे असे सांगत मोदी यांनी भारतीय पोस्ट पेमेंट बॅंकेचे उदाहरण दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.