पुणे – एटीएम मशिनचा मुख्य दरवाजा गॅस कटरच्या सहाय्याने कट करत असताना आग लागून सुमारे 8 लाख जळून खाक झाल्याप्रकरणात एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी. आगरवाल यांनी 25 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला.
सर्फुद्दीन ऊर्फ सरफु हसन असे त्याचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. खंडेराव टाचले यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात आणखी सात जणांवर गुन्हा दाखल आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सर्फुद्दीन याने जामिनासाठी अर्ज केला. या गुन्हाचा तपास पूर्ण झाला असून, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे.
आरोपीला जामीन देण्याची मागणी ऍड. खंडेराव टाचले यांनी केली. त्यानुसार पुराव्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, न्यायालयात सुनावणीच्या प्रत्येक तारखेला हजर राहणे, राहत असलेला पत्ता न्यायालयात देण्याच्या अटीवर न्यायालयाने हा जामीन मंजुर केला.