पुणे – महापालिकेच्या पाणी पुरवठा खात्यातील कार्यकारी अभियंत्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याच्या प्रकरणात भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर आणि चार नगरसेवकांसह 41 जणांना सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी प्रत्येकी 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणातील सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. बचाव पक्षातर्फे ऍड. सुधीर शहा, ऍड. प्रसाद कुलकर्णी, ऍड. के. टी. आरू, ऍड. शैलेश म्हस्के, ऍड. रवी लाढाणे, ऍड. ऋषिकेश घोरपडे आणि ऍड. सिद्धार्थ राठोड यांनी काम पाहिले.
तपासास हजर राहणे आणि पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा न करण्याचा अटीवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.