मुंबई – दक्षिणेतील अभिनेत्री अनुष्का शेट्टी नेहमीच तेलुगू आणि तमिळ प्रेक्षकांची आवडती राहिली आहे. ‘बाहुबली’ चित्रपटाच्या फ्रेंचाइजीमधील ‘देवसेना’ या पात्राने अनुष्का तिच्या करिअरच्या शिखरावर पोहोचली. तिचा सहकलाकार प्रभासने ‘बाहुबली’ नंतर बॉलिवूडकडे आपले लक्ष वळवले, तर अनुष्काने वेगळा मार्ग निवडला. अशात तिचा चित्रपट बऱ्याच दिवसांनी प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
एका मुलाखतीत अनुष्का म्हणाली की,’मी बाहुबलीच्या यशाचा फायदा घेतला नाही आणि संपूर्ण भारतातील चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ नंतर मी 2018 मध्ये एक हिट तेलुगु चित्रपट केला. यानंतर मी ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘निशब्धम’ (2020) मध्ये काम केले. बाहुबलीनंतर मला थोडा वेळ ब्रेक घायचा होता. त्यावेळी मला विश्रांतीची गरज होती. माझ्याकडे ब्रेक घेण्याचे कोणतेही ठोस कारण नव्हते पण मला खरोखरच थोडा ब्रेक हवा होता.’
मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी’ ही एक अनोखी कथा आहे. यामध्ये अनुष्का शेट्टीने शेफ अन्विता रावली शेट्टीची भूमिका साकारली आहे. 7 सप्टेंबर रोजी तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. अनुष्काने 2005 मध्ये तेलुगू चित्रपट सुपरमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून ती दरवर्षी दोन ते तीन चित्रपट करते. मात्र, गेल्या पाच वर्षांत ती तितकी सक्रिय नव्हती. अनुष्का सांगते की ब्रेकनंतर ती एका स्क्रिप्टच्या शोधात होती जी खरोखरच अनोखी असेल.