मुंबई – बादशाहचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे ज्यामध्ये तो परफॉर्म करताना स्टेजवरून खाली पडल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होताच बादशाहने या व्हिडिओ क्लिपवर काही स्पष्टीकरण दिले आहे आणि प्रत्यक्षात काय घडले ते सांगितले आहे.
Thats not me, but whoever that is i hope he is safe 🙏 https://t.co/27nVDwjIFW
— BADSHAH (@Its_Badshah) July 17, 2023
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. हा माणूस काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि मॅचिंग शॉर्ट्ससह पांढऱ्या स्नीकर्समध्ये आहे. ही व्यक्ती हुबेहुब बादशाहसारखा दिसते. गाताना ती व्यक्ती अचानक स्टेजवरचा तोल गमावून खाली एका उघड्या पेटीत पडते. स्टेजवरील ताबडतोब पुढे येत त्याला मदत करतांना दिसत आहे.
काही रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की, ही व्यक्ती बादशाह आहे जी परफॉर्मन्सच्या मध्येच स्टेजवरून खाली पडली होती. आता बादशाह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो कारच्या आत दिसत आहे. बादशाह म्हणताना दिसतो,’भाऊ, मी पूर्णपणे ठीक आहे, मी कोणत्याही स्टेजवरून पडलो नाही.’
मी सुरक्षित आहे, मला बोलता येत आहे, माझे हात-पाय ठीक आहेत, असेही बादशाहने म्हटले आहे. स्टेजवरून पडलेली व्यक्ती, मला आशा आहे की तो बरा असेल. त्या व्हिडिओत मी नसल्याचंही बादशाहने ट्विटरवर स्पष्ट केलं आहे.