अॅक्शन ड्रामा चित्रपट ‘बाप’चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या चित्रपटात 80 आणि 90 च्या दशकातील सुपरस्टार – जॅकी श्रॉफ, संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती आणि सनी देओल एकत्र आहेत. निर्मात्यांनी जारी केलेल्या पोस्टरमध्ये हे चारही कलाकार गुंडांच्या अवतारात दिसत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. विवेक चौहान दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
‘बाप’च्या पोस्टरमधील सर्व कलाकारांचा लूक खूपच इंटरेस्टिंग दिसत आहे. सनीला पाहून असे वाटते की, तो या चित्रपटात कैद्याची भूमिका साकारणार आहे. इतकेच नाही तर केशरी रंगाचा ड्रेस, लांब केस आणि दाढी असलेल्या सनीला पाहून चाहत्यांना त्याचा ‘जीत’ चित्रपट आठवत आहे. दुसरीकडे, मिथुन, जॅकी आणि संजय यांच्या लूकमध्येही बराच बदल झालेला दिसत आहे.
View this post on Instagram
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत जॅकी श्रॉफने लिहिले, “शूट धमाल, दोस्ती बेमिसाल (sic).” विशेष म्हणजे या चित्रपटाच्या पोस्टरपूर्वी जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनी जूनमध्ये एका फोटोद्वारे चित्रपटाच्या शूटिंगची माहिती दिली होती. मात्र, या फोटोत सनी देओल नव्हता. त्यानंतर सनीने गमतीने सांगितले की, तो लवकरच धाई किलो के हाथ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहभागी होणार आहे.