बाप रे.., खेड तालुका त्रिशतकाकडे; 24 तासांत 294 बाधितांचा उच्चांक

राजगुरूनगर  -खेड तालुक्‍यात मागील 24 तासात 294 जण करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. वर्षभरातील आतापर्यंतच्या आकडेवारीतील 24 तासांतील ही सर्वाधिक संख्या आहे. तालुक्‍यात करोना समूह संसर्गाचा हाहाकार उडाल्याने भीतीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खेड तालुक्‍यातील ही सर्वाधिक संख्या आहे.

करोना साखळी तोडण्याचे प्रशासनाकडून मोठे प्रयत्न सुरु असताना नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्‍यातील नागरिक करोनाचे शिकार बनत असून दिवसागणिक संख्या वाढल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे. मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी आता संख्या वाढल्याने मृत्युदरात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तालुक्‍यातील चाकण, आळंदी, राजगुरूनगर नगर परिषदा व त्या जवळील गावांमध्ये करोनाचा समूह संसर्ग सुरु आहे. खेड तालुक्‍यात 24 तासात चाकण 50, आळंदी 18, राजगुरूनगर 33 या नगरपरिषदांसह मेदनकरवाडी 28, नाणेकरवाडी 20, चऱ्होली खुर्द 10, चिंबळी 10, कडाचीवाडी 14, खराबवाडी 12, म्हाळुंगे, भोसे प्रत्येकी 7, कोरेगाव बुद्रुक, आंबेठाण प्रत्येकी 6, शेलपिंपळ्गाव, निघोजे प्रत्येकी 5, चांडोली, निमगाव प्रत्येकी 4, कुरूळी, वाफगाव, काळूस प्रत्येकी 3, कडूस, 

मोई, कडधे, सोळू, सांडभोरवाडी, सातकरस्थळ, वडगाव घेणंद, केळगाव, रासे, कनेरसर, वरुडे, वासुली प्रत्येकी 2, वाकी खुर्द, पाईट, कुरकुंडी, किवळे, होलेवाडी, जैदवाडी, खरपुडी खुर्द, मांजरेवाडी, राक्षेवाडी, शिरोली, तिन्हेवाडी, वाकी बुद्रुक 2. गोलेगाव, शेलगाव, वाडा, वडगाव पाटोळे, बोरदरा, खालूंब्रे, शिवे, दावडी, गुळाणी गावात प्रत्येकी 1 रुग्ण आढळले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.