वळसे हद्दीत वडाचे झाड रस्त्यावर कोसळले

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत

नागठाणे – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वळसे (ता. सातारा) गावच्या हद्दीत हॉटेल इंद्रप्रस्थसमोर वडाचे मोठे झाड पडले. वडाच्या झाडावरून नेलेली वीजवाहक तार तुटल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास विस्कळीत झाली होती.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राष्ट्रीय महामार्गाच्या कराड-सातारा मार्गिकेवर वळसे गावच्या हद्दीतील मोठे वडाचे झाड रविवारी दुपारी 2 वाजता दुचाकी (एमएच-09-डीएल-3026) व चारचाकी (एमएच-50-एल-4532) वाहनांवर पडले. यात दुचाकीवरील शैलेश भोसले (वय 35) व महेश भास्कर (वय 32, रा. रंकाळा, कोल्हापूर) हे किरकोळ जखमी झाल्या. चारचाकी गाडीतील कोणीही जखमी झाले नाही.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदत केंद्राचे दस्तगीर आगा, कराड महामार्ग वाहतूक पोलीस केंद्राचे सपोनि अस्मिता पाटील, सहाय्यक फौजदार राजू बागवान, पोलीस नाईक, वैभव पुजारी, रूपेश कारंडे, रायसिंग घोरपडे, देवदत्त शेडगे, नागठाणे येथील पिंटू सुतार, सोहेल सुतार व बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाजूला काढले.

पोलिसांनी वाहतूक सेवा रस्त्याने वळवली. त्यानंतर दोन कटरच्या साहाय्याने वडाच्या फांद्या कापून संपूर्ण झाड क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढून ठेवण्यात आले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.