मुंबई – बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आगामी ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटासाठी जख्ख म्हाताऱ्याचा रोल केला असून, त्यांच्या या रोलचा फर्स्ट लुक काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. टिपीकल लखनवी मुस्लिम वृद्ध व्यक्तीप्रमाणे त्यांचा हा गेटअप करण्यात आला आहे. लांब दाढी, डोक्यावर गोल टोपी आणि निळा कुर्ता घातलेला अमिताभ यांचा हा लुक होता.
दरम्यान, याच चित्रपटाची अमिताभ आणि अभिनेता आयुष्मान खुराणा यांचा लूक व्हायरल झाला आहे. ‘गुलाबो सिताबो’ हा एक कॉमेडी-ड्रामा चित्रपट असणार आहे. गुलाबो सिताबो चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराणा देखील मुख्य भूमिका साकारत आहे. फिल्ममेकर शूजीत सरकार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
IT’S OFFICIAL… New release date… #GulaboSitabo to release *earlier*: 28 Feb 2020… Stars Amitabh Bachchan and Ayushmann Khurrana… Directed by Shoojit Sircar… Here’s the first look of Ayushmann from the film: pic.twitter.com/wCZMZMXx29
— taran adarsh (@taran_adarsh) October 30, 2019