अयोध्या – अयोध्येतलि राममंदिराच्या भूमीपूजनाच्या तयारी अंतीम टप्प्यात आली असून सर्व 200 अती महत्वाच्या व्यक्तींना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. मात्र, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे दोन कायम सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा सहभागी होणार आहेत.
प्रयागराजचे वासुदेवानंद महाराज यांना चौमास नक्षत्रामुळे आपली गादी सोडता येत नसल्यामूले ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने सहभागी होतील.
या शिवाय सर्वोच्च न्यायलयात रामलल्लाच्या बाजूने बाजू मांडणारे वकील पराशरन चेन्नईत असल्याने आणि ते 92 वर्षीय असल्याने तेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने सहभअगी होतील अशी प्राथमिक माहित म्मिळाली आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशचे नुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोध्येत पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे भूमी पूजन होणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते 12 वाजून 15 मिनिट आणि 15 सेकंदांनी 32 सेकंद वेळात पहिली वीट रचली जाईल. ही वीट 35 ते 40 किलो वजनाची असून ती चांदीची बनवली आहे. ज्योतीष शास्त्राच्या दृष्टीने त्याला अपरंपार महत्व असून त्यामुळे राहु आणि केतूचा प्रभाव नाहीसा होतो.
सुरक्षा कडेकोट
केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि स्थअनिक प्रशासनाने या कार्यक्रमासाठीची सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले आहे. करोना प्रतिबंधित आचार संहितेचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. कोणत्याही जागी पाचपेक्षा ध्धिक जण एकत्र येणअर नाहीत याचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. शहरात 12 ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे.
मोदी यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणअ, विशेष संरक्षण गट (एसपीजी) आणि जिल्हा प्रशासनाने ब्ल्यू प्रिंट बनवली आहे. त्यात सात सात विभाग बनवण्यात आले आहेत. त्यात हनुमानगढी आणि शरयु किनाऱ्याचा समावेश आहे.