राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मानुषी छिल्लरने मासिक पाळी दरम्यानच्या स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियावरच्या अभियानाची सुरुवात केली आहे. तिने या अभिनयादरम्यान अनेक माहिती सोशल मीडियावर शेअर करत जनजागृती केली आहे.
View this post on Instagram
तिने सांगितले की,’देशात आजही मासिक पाळी हा विषय चिंतेचा आहे. मासिक पाळीबाबतची जनजागृती माझ्या ‘प्रोजेक्ट शक्ति’ या संघटनेद्वारे संपूर्ण देशात करणार आहे. विशेष म्हणजे ही संघटना गेल्या काही वर्षापासून महिलांमध्ये जनजागृती करत आहे.
मानुषी छिल्लर नेहमीच सामाजिक मुद्यावर काम करीत असते, यापूर्वीही तिने राष्ट्रीय पोषण आहार दिनानिमित्त पोषण आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियावरच्या अभियानाची सुरुवात केली होती.
View this post on Instagram
दरम्यान, तिच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली एका कॉमेडी सिनेमात ती विकी कौशलबरोबरदेखील असणार आहे. या सिनेमाची अधिकृत घोषणा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.