शेतकरी आंदोलनामुळे जान्हवी सलमानच्या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये विघ्न

नवी दिल्ली –  शेतकरी आंदोलनाचा फटका आता चित्रपटसृष्टीला सुद्धा बसल्याचे दिसून येत आहे. नुकतंच अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी चित्रपटासाठी पंजाब मध्ये दाखल झाले होते. मात्र, शेतकऱ्यांना याची चाहूल लागताच जोपर्यंत कृषी कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत याठिकाणी चित्रपटाचे शुटिंग होऊ  देणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी चित्रपटाच्या सेट कडे आपला मोर्चा वळविला. 

यावेळी शेतकऱ्यांनी सेटवर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बराचवेळ हा गोंधळ सुरु होता. जेव्हा पोलिसांनी शेतकऱ्यांना शुटिंग बंद केल्य़ाचे सांगितले तेव्हा हे शेतकरी शांत बसले. आणि आपला पवित्रा मागे घेतला. जान्हवीच्या आगामी ‘गुड लक जेरी’ चित्रपटाचं शूटिंग पंजाबमध्ये सुरू झाले होते. तर अभिनेता सलमान खानही पुढील आठवड्यात चित्रपटाच्या शुटिंगसाठी पटियालाला जाणार आहे. 

उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी राजधानी क्षेत्र दिल्ली बाहेर आंदोलन सुरू केले आहे. नव्या कृषी कायद्याविरोधात हे आंदोलन सुरु करण्यात आले असून, गेल्या महिन्याभरापासून शेतकरी दिल्ली बाहेर ठिय्या मांडून आहेत. 

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.