पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या वतीने गोखलेनगर, जनवाडी येथील 14 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये करोना प्रतिबंधक लसीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत 500 हून अधिक मुलांचे लसीकरण करण्यात आले.
मुलांना ऑफिसपासून लसीकरण केंद्रापर्यंत नेण्याची आणण्याची सोय निलेश निकम यांच्याकडून करण्यात आली. या उपक्रमाच्या वेळी अशोक झडपे, दिपाली सपकाळ, साहिल कंट्रोल, गणेश जोशी, अनिल पवार, कृष्णा जाधव, मयूर निकम, अनिल मंजुळकर, संदेश जोशी, विनोद परदेशी, साक्षी पानसरे, कुणाल हेंद्रे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.