रेडा-करोना सारख्या जीवघेण्या आजारापासून नागरिक, रुग्णांना सेवा देणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी, पोलीस, दिवसभर राबणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे इंदापूर तालुक्यातील घराघरातून नागरिकांनी सायंकाळी पाच वाजता टाळ्या, ताट वाजवत आभार मानले. इंदापूर शहर व परिसरातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरी राहणे पसंद करत केले.
नाळगरिकांनी आवरावे स्वतःला तरच सावरता येईल करोनाला, खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी घेणारे अधिकारी, आरोग्य विभागातील कर्मचारी यांचे कायम ऋणी आहोत. जोपर्यंत करोना विषाणू हद्दपार होत नाही, तोपर्यंत सर्व नागरिकांनी खबरदारी पाळावी, असे आवाहन नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले.