पुणे – भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी भागात यंदाच्या मान्सून हंगामामध्ये सर्वसामान्य पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या सर्वच भागात सरासरी इतका पावसाची शक्यता अधिक आहे.
श्रीलंका मालदीवसह दक्षिण अशिया आणि वायव्य अशियातील पाकिस्तानात सरासरीपेक्षा अधिक तर उत्तर अशिया उत्तर बंगालच्या उपसागरालगतच्या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे पुर्वानुमान साऊथ एशियन क्लायमेंट आऊटलंक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त केला आहे.
2019 मधील मान्सूनच्या पावसाचा आढावा आणि येत्या हंगामातील (2020) अंदाज व्यक्त करण्यासाठी दक्षिण आशियाई देशांच्या फोरमची बैठक झाली.
भारतासह अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका या देशांसह जागतिक हवामान संघटनेबरोबरच इतरही आंतरराष्ट्रीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्थाकडून माहिती विश्लेषण व विचारमंथनानंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला.