धरण 91 टक्के भरले : अवघ्या 12 दिवसांत पाणीपातळीत झपाट्याने वाढ
भोर – पुणे जिल्ह्यातील सर्वात जुने असलेले भाटघर धरण रविवारी (दि. 16) 91 टक्के भरले आहे. धरणाला 81 दरवाजे असून त्यातील 45 स्वयंचित आहेत. या स्वयंचित दरवाजातून पाणी नीरा नदीत कोसळ आहे. जर भोर तालुक्यात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण दोन दिवसांत 100 टक्के भरेल, असा विश्वास धरण प्रकल्पाचे शाखा अभियंता अनिल नलावडे व नानासाहेब कांबळे यांनी व्यक्त केला आहे.
भाटघर धरण गेल्यावर्षी 4 ऑगस्ट रोजी 100 टक्के भरले होते.
मात्र, या वर्षी 4 ऑगस्ट रोजी धरणात अवघा 40 टक्के साठा होता. मात्र, बुधवार (दि. 5)पासून पाऊस पावासाचा जोर वाढल्याने आवघ्या 12 दिवसांत धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ होवून धरण रविवारी 91 टक्के भरले आहे. धरण परिसरात आजअखेर 674 मि.मी. पावसाची नोंद झाली असून जलाशय पातळी 621.12वर पोहचली असून धरणात 21316 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. धरण प्रकल्पाचे पाणी वीर धरणात संकलीत करून उजव्या कालव्याने बारामती व इंदापूर तर डाव्या कालव्याद्वारे खंडाळाल, फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्यांतील लाभ क्षेत्रीतील जमिनीस पुरवठा केला जातो.
- पोटधरण “लेक व्हायटनिंग’ @120
कृष्णा खोऱ्यातील येळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या भाटघर धरणाच्या पोटात “लेक व्हायटनिंग’ हे एक धरण आहे. हे धरण भाटघर धरण बांधण्याआगोदर बांधण्यात आलेले असून ते 5 टि. एम. सी. क्षमतेचे आहे. आज त्याला 120 वर्षे पूर्ण झाली आहेत. दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी ब्रिटीशांनी हे धरण बांधले होते. हे धरण इंग्रजी “एस’ आकाराचे असून या धारणालाही 81 दरवाचे असून 45 स्वयंचलित दरवाजे आहेत. हिच संकल्पना भाटघर धरण प्रकल्पातही वापरली गेली असून हे वैशिष्यपूर्ण धरण एप्रिल-मे महिन्यात पाहायला मिळते. धरणाची उंची 103 फुटांची आहे.
- नीरादेवघर 80 टक्के भरले
नीरादेवघर धरणक्षेत्रात संततधार पाऊस कोसळत असून धरण 80 टक्के भरले आहे. हे धरण 12 टीएमसी पाणीसाठवण क्षमतेचे असून धारणाच्या पाणलोट क्षेत्रात आजअखेर 1354 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. हेही धरण 4 ते 6 दिवसांत 100 टक्के भरण्याची शक्यता वर्तवाली जात आहे.