मेलबर्न – ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चक्क एक नाट्य घटले. या सामन्यात तिसऱ्या दिवशी उपहारानंतरचा खेळ काहीसा उशिरा सुरु झाला. त्याचे कारणही नवल वाटणारे ठरले.
मेलबर्न स्टेडियमच्या पंचांचे कक्ष ज्या मजल्यावर आहेत त्याती एक लीफ्ट अचानक बंद पडली व तिसरे पंच रीचर्ड इलिंगवर्थ त्यात अडकून पडले. दोन्ही संघाचे खेळाडू जेवण करुन मैदानात उतरले तसेच मैदानावरील पंचही आपापल्या जागी उपस्थित होते मात्र, त्याचवेळी तिरे पंच जागेवर नसल्याचे लक्षात आले व एकच गोंधळ उडाला. त्यानंचर लीफ्ट सुरु झाली व ते आल्या जागी परतले व सामना सुरु झाला.
#AUSvPAK 2nd Test Day 3 Stumps : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाची कसोटीवर पकड मजबूत….
दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत गुरुवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने या कसोटीतही विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३१८ धावांवर संपल्यावर त्यांनी पाकिस्तानचा पहिला डाव २६४ धावांवर रोखला. पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफीक व शान मसुद यांनी अर्धशतके फटकावली. तरीही ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५४ धावांची आघाडी घेतली.
त्यानंतर आपल्या दुसऱ्या डावात गुरुवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ६ गडी गमावून १८७ धावा केल्या होत्या. मिशेल मार्श (९६) याचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. आता सामन्याचे दोन दिवस बाकी असून ऑस्ट्रेलियाकडे एकूण आघाडी २४१ धावांची आहे. ते आपली आघाडी शुक्रवारी आणखी कीती वाढवतात व त्यानंतर पाकिस्तानचा संघ त्याला कसे उत्तर देतो यावर त्यांचा विजय अवलंबून राहणार आहे. मात्र, सध्यातरी सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपली पकड मजबूत केली आहे.