#AUSvPAK 1st Test Day 2 stumps, Perth : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 487 धावांवर संपला. मिशेल मार्शचे शतक अवघ्या 10 धावंनी हुकले. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात 2 गडी गमावून 132 धावा केल्या आहेत. ते आता 355 धावांनी पिछाडीवर आहेत.
Following Aamir Jamal’s six-fer, Pakistan finish Day Two at 132-2 trailing by 355 runs 🏏#AUSvPAK pic.twitter.com/sHCrsjYqic
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 15, 2023
तत्पूर्वी, 5 बाद 346 धावांवरून पुढे खेळ सुरु झाल्यावर मार्शने अलेक्स केरीसह भक्कम भागीदारी करताना संघाला चारशे धावांच्यापुढे मजल मारुन दिली. मार्श शतक साकार करणार असे वाटत असतानाच 90 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 107 चेंडूत 15 चौकार व 1 षटकार फटकावला. तो परतल्यावर तळातील फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला सर्वबाद 487 अशी मोठी धावसंख्या उभारता आली. पाकिस्तानकडून नवोदित वेगवान गोलंदाज अमर जमालने सर्वाधिक 6 बळी घेतले. खुर्रम शेहजादने 2 गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाने उभ्या केलेल्या मोठ्या धावसंख्येला उत्तर देताना सलामीवीर अब्दुला शफीक व ईमाम उल हक यांनी सावध फलंदाजी करत 71 धावांची सलामी दिली. शफीक आपले अर्धशतक पूर्ण करु शकला नाही. तो 121 चेंडूंचा सामना करत 6 चौकारांच्या मदतीने 42 धावांवर बाद झाला. त्यानंतर शान मसुदसह इमाम उल हकने संघाचे शतक फलकावर लावले. मसुद स्थिरावलेला असतानाही 30 धावांवर परतला. त्यावेळी इमामने शहजादला साथीला घेत संघाचे दिवसअखेर आणखी नुकसान होऊ दिले नाही.
पाकिस्तान अद्याप 355 धावांनी पिछाडीवर अशून फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी त्यांना अद्याप 156 धावांची गरज आहे. खेळ थांबला तेव्हा इमाम 38 तर शहजाद 7 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क व नाथन लियॉन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
#AUSvPAK 1st Test Day 1stumps : वॉर्नरचे शानदार दीडशतक; पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व…
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 113.2 षटकांत सर्वबाद 487 धावा. (डेव्हिड वॉर्नर 164, मिशेल मार्श 90, उस्मान ख्वाजा 41, ट्रेव्हीस हेड 40, अलेक्स केरी 34, स्टीव्ह स्मिथ 31, अमर जमाल 6-111, खुर्रम शेहजाद 2-83).
पाकिस्तान पहिला डाव – 53 षटकांत 2 बाद 132 धावा. (अब्दुला शफीक 42, शान मसुद 30, इमाम उल हक खेळत आहे 38, खुर्रम शेहजाद खेळत आहे 7, मिचेल स्टार्क 1-24, नाथन लियॉन 1-40).