येरवडा पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांस मारहाण
पुणे,दि.4- येरवडा पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना एकाने खाली पाडून मारहाण केली. यामध्ये एका कर्मचाऱ्याच्या पायाला आणी नाकाला दुखापत झाली. ही घटना येरवडा येथील साजीक गॅरेजजवळ घडली. याप्रकरणी सुरेश केशव गालफाडे(40,रा.सैनिकवाडी) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी पोलीस नाईक राजीव हिले यांना पोलीस नियंत्रण कक्षातून एक व्यक्ती सादिक गॅरेजजवळ गोंधळ घालत असल्याचा कॉल आला होता. त्यानूसार ते पोलीस हवालदार बडे यांना घेऊन घटनास्थळी गेले.तेथे आरोपी सुरेशने त्यांना तुम्ही खरेच पोलीस आहात का? अशी विचारणा करत शिवीगाळ केली. यानंतर त्यांना धक्का-बुक्की करत खाली पाडून मारहाण केली. यामध्ये फिर्यादीच्या गुडघ्याला आणी नाकाला मार बसला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सुरेशला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश गुर्जर करत आहेत.