कॅनबेरा, (ऑस्ट्रेलिया) – एका ऑस्ट्रेलियन महिलेला 20 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर सोमवारी माफ करण्यात आले. तिच्यावर तिच्याच 4 मुलांची हत्या केल्याचा आरोप होता. मात्र नवीन वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे या चार मुलांचा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला होता, असे निष्पन्न झाल्यामुळे तिला तुरुंगातून सोडण्यात आले.
फॉलबिग(Kathleen Folbigg) , आता 55 वर्षांच्या आहेत. गव्हर्नमेंट मार्गारेट बीझले यांनी बिनशर्त माफी दिल्यानंतर, न्यू साउथ वेल्स राज्यातील ग्राफ्टन येथील तुरुंगातून त्यांची सुटका करण्यात आली. न्यू साउथ वेल्सचे ऍटर्नी-जनरल मायकेल डेली यांनी नवीन वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असावा हे मान्य केले.
एका याचिकेद्वारे फोलबिग यांच्या अपराधाची दुसरी चौकशी झाली. ते मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा आहे, असे या अहवालात म्हटले आहे. या अहवालावर 90 शास्त्रज्ञ, वैद्यकीय व्यवसायी आणि संबंधित व्यावसायिकांनी स्वाक्षरी केली आहे.
फोलबिग 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत होत्या. ही शिक्षा 2033 मध्ये संपणार होती. त्या 2028 मध्ये पॅरोलसाठी पात्र ठरल्या असत्या. पण त्यापूर्वीच त्यांची शिक्षा माफ केली गेली. त्यांच्या मुलांचा मृत्यू दशकभराच्या काळात वेगवेगळ्या दिवशी झाला. ही मुले 19 वर्षांपासून 19 महिन्यांच्या वयाची होती.