#SAvAUS T20 : दक्षिण आफ्रिकेविरूध्द आॅस्ट्रेलियाचा २-१ ने मालिकाविजय

तिस-या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा ९७ धावांनी विजय

केपटाउन :वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क, फिरकीपटू एश्टन एगर आणि एडम जम्पा यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने मालिकेतील तिस-या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ९७ धावांनी पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह आॅस्ट्रेलियाने तीन टी-२० क्रिकेट सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. मिशेल स्टार्क सामन्याचा मानकरी तरी अॅरन फिंच मालिकावीर ठरला.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्विकारताना आॅस्ट्रेलिया संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होत. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने डेविड वाॅर्नरच्या ५७(३७), अॅरन फिंचच्या ५५(३७)  आणि स्टीव स्मिथच्या नाबाद ३०(१५) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ५ बाद १९३ अशी मजल मारली होती. आफ्रिकेकडून गोलंदाजीत कगिसो रबाडा, ऐनरिक नाॅर्टजे, लुंगी एनगिडी, ड्वेन प्रीटोरियस आणि तबरेज शम्सी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

विजयासाठी १९४ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाचा डाव १५.३ षटकात ९६ धावसंख्येवरच आटोपला. आफ्रिकेकडून रैसी वैन डर डुसेनने २४(१९), हेनरिक क्लासेनने २२(१८) आणि डेविड मिलरने १५(१८) धावांची खेळी केली.

आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत एश्टन एगर (४ षटकात १६ धावा) आणि मिचेल स्टार्क (२.३ षटकात २३ धावा) यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. एडम जम्पाने २ तर मिचेल मार्श आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी १ गडी बाद संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.