ब्रिस्बेन: नवोदित गोलंदाज शीम शहाने ओव्हरस्टेपींगची केलेली चूक पाकिस्तानला चांगलीत महागात पडली. या जीवदानानंतर सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने केलेल्या दीडशतकी खेळीने ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर 1 बाद 312 धावा करत पाकिस्तानवर 72 धावांची आघाडी घेत पहिल्या कसोटी सामन्यावर पकड मिळविली आहे.
काल पाकिस्तानचा डाव 240 धावांवर संपविल्यावर यजमानांनी धडाकेबाज फलंदाजीचे दर्शन घडविले. वॉर्नरला सुरेख साथ देत जो बर्नने 97 धावांची खेळी केली. त्यानंतर मात्र मार्नस लेबुशेनने जबाबदारीने खेळत वॉर्नरसह संघाला त्रिशतकी मजल मारून दिली.
नशीमने वॉर्नरचा बळी मिळविला होता, मात्र हा चेंडू नोबॉल असल्याने त्याला जीवदान मिळाले. याचा पुरेपूर लाभ घेत त्याने बंदीची शिक्षा भोगून पुनरामन केल्यानंतर जवळपास वर्षभराने कसोटी शतक फटकावले.