World cup 2023 AUS vs BAN Match Result : -पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर शनिवारी( दि.11) मिचेल मार्श नावाचे वादळ धडकले. या वादळात चिवट असा बांगलादेशी संघाची 306 सारखी मोठी धावसंख्या उभारूनही वाताहत झाली. ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचे 307 धावांचे आव्हान 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 44.4 षटकातच पार केले.
मिचेल मार्शने 132 चेंडूत नाबाद 177 धावा ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय एकदम सोपा करून दिला. त्याला साथ देणाऱ्या स्टीव्ह स्मिथने नाबाद 63 तर डेव्हिड वॉर्नरने 53 धावा केल्या. मार्शने आपल्या या खेळीत 17 चौकार आणि 9 षटकार मारत 87 चेंडूत शतक पूर्ण केले.
मार्शने बांगलादेशविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करताना अनेक विक्रमांना अनेक विक्रमांना तिलांजली दिली. तर बांगलादेशकडून मुस्तफिकूर रेहमान व तस्किन अहमद यांनी प्रत्येकी एक यश मिळाले.
तत्पूर्वी, बांगलादेशकडून तोहिद ऋदय (74), नजमुल शांतो (45), ताजित हसन (36), लिटन दास(36) यांनी चांगली खेळी खेळताना संघाला 306 धावांचा पल्ला गाठून दिला होता. तर ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झाम्पा व सेयान ऍबोट यांनी दोन फलंदाज बाद केले.
मार्शने सेहवागला मागे टाकले
मिचेल मार्शने केलेली 177 धावांची खेळी विश्वकरंडकात बांगलादेशविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी हा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर होता. सेहवागने 2011 विश्वकरंडकात बांगलादेशविरुद्ध 175 धावांची खेळी केली होती. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या क्विंटन डीकॉक आणि डेव्हिड वॉर्नर यांनी बांगलादेशविरुद्ध विश्वकरंडकात अनुक्रमे 174 आणि 166 धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : 50 षटकांत 8 बाद 306 (तोहिद ऋदय 74, नजमुल शांतो 45, ताजित हसन 36, लिटन दास 36; ऍडम झाम्पा 2-32, सेयान ऍबोट 2-61, मार्कस स्टॉयनिस 1-45) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : 44.4 षटकांत 2 बाद 307 (मिशेल मार्श नाबाद 177- 132 चेंडू, 17 चौकार, 9 षटकार, डेव्हिड वॉर्नर 53, स्टिव्ह स्मिथ नाबाद 63; मुस्तफिकूर रेहमान 1-76, तस्किन अहमद 1-61).