अहमदाबाद – अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम (मोटेरा स्टेडियम)चे नाव बदलण्यात आलं आहे. या स्टेडियमला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान म्हणून मोटेरा स्टेडियम ओळखले जाते. मात्र या नामांतरावरून काँग्रेसनेते हार्दिक पटेल यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून टीका केली आहे.
गुजरातमधील पाटीदार समाजाचे आणि काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोटेरा स्टेडियमच्या नामांतराला विरोध दर्शवला आहे. तसेच, भाजप सरकारचा हा निर्णय संतापजनक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलय.
दुनिया के सबसे बड़े अहमदाबाद स्थित सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम का नाम बदलकर नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम रखा गया है, क्या यह सरदार पटेल का अपमान नहीं हैं ? सरदार पटेल के नाम पर मत माँगने वाली भाजपा अब सरदार साहब का अपमान कर रही हैं। गुजरात की जनता सरदार पटेल का अपमान नहीं सहेगी।
— Hardik Patel (@HardikPatel_) February 24, 2021
अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम करण्यात आलं आहे. हा सरदार पटेल यांचा अपमान नाही का ? सरदार पटेल यांच्या नावाने मतं मागणारं भाजप सरदार साहेबांचा अपमान करत आहे. गुजरातमधील जनता सरदार पटेल यांचा अपमान सहन करणार नाही, असं ट्विट हार्दिक पटेल यांनी केलं.
भारत रत्न, लोह पुरुष सरदार पटेल ने आरएसएस पर प्रतिबंध लगाया था और उसी कारण आरएसएस के चेले सरदार पटेल का नाम मिटाने का हर संभव प्रयास कर हैं। बाहर से मित्रता पर भीतर से बैर, यह व्यवहार भाजपा का सरदार पटेल से हैं। एक बात याद रखिएगा की सरदार पटेल का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। 😡
— Hardik Patel (@HardikPatel_) February 24, 2021
भारतरत्न आणि लोहपुरुष सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती. त्यामुळे आरएसएसचे चेले सरदार पटेल यांचं नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. बोलताना आदर आणि मनात कटुता असं वर्तन भाजपचं सरदार पटेल यांच्याविषयी आहे. मात्र सरदार पटेल यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असंही हार्दिक पटेल यांनी म्हटलं.