श्रीगोंदा – पोटच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बापाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासला गेला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नराधम बापाविरुद्ध अत्याचार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान, या
हृदयद्रावक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, शनिवारी पीडित मुलीची आई आणि मुलीचा भाऊ हे शेजारी मामाच्या घरी गेले होते. यावेळी घरात पीडित मुलगी एकटी होती. शनिवारी रात्री या नराधम बापाने पोटच्या 15 वर्षीय मुलीवर दोनवेळा अमानुषपणे अत्याचार केला. रविवारी सकाळी मुलीची आई परतल्यानंतर पीडित मुलीने घडलेली घटना आईला सांगितली.
हकीकत कथन केल्यावर त्या दोघींनी थेट पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नराधम बापाविरुद्ध अत्याचार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी बापाला काही वेळातच जेरबंद केले. दरम्यान, आरोपी नराधम बापाने काही महिन्यांपूर्वी देखील आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मुलगी व आईच्या जागरुकतेमुळे पीडिता बचावली होती, अशी माहिती समजली.