पिरंगुट- येथील ग्रामपंचायतीच्या वतीने चौदाव्या वित्त आयोगातून वंचित महिलांना तीन टक्के अपंग निधीतून आर्थिक मदत करण्यात आली. या सर्व लाभार्थींना मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले आहेत. यावेळी पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे, उपसरपंच प्रवीण कुंभार, ग्रामविकास अधिकारी डी. डी. भोजने, माजी उपसरपंच छाया पवळे, अश्विनी निकटे, रेश्मा पवळे, रामदास गोळे, तेजस्विनी उभे, ग्रामपंचायत सदस्य राहुल पवळे, विकास पवळे, महेश वाघ, लक्ष्मण निकटे, श्रीकांत केदारी, अंकुश खडके, सुरेखा पवळे, सारिका गोळे, सुवर्णा नवाळे, जनाबाई गोळे, सारिका केदारी आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
तीन टक्के अपंग कल्याण निधीतून एकूण 19 लाख 48 हजार रुपयांचे धनादेश दिले असून, 39 लाभार्थींना याचा उपयोग होणार आहे.14 व्या वित्त आयोगातून वंचित महिलांना उपजीविकेसाठी 2 लाख 25 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले असून, 15 लाभार्थींना याचा उपयोग होणार आहे.गावातील सर्व घटकांतील लाभार्थींना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या योजनांचा फायदा मिळवून दिला जाणार आहे. गेल्या आठ महिन्यांत 54 नागरिकांना याचा लाभ मिळाला असून, गरजूंना अधिकाधिक मदत मिळवून देणार असल्याचे सरपंच चांगदेव पवळे व सदस्य राहुल पवळे यांनी सांगितले.