अलमटी (कझाकस्तान) : आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात तब्बल 11 महिन्यांच्या वास्तव्यानंतर नासाच्या ख्रिस्तीना कोच या महिला आंतराळवीर गुरूवारी पृथ्वीवर सुखरूप परतल्या. त्यांनी अवकाशातील 328 दिवसांच्या वास्तव्यानंतर कझाक येथील केंद्रावर सकाळी नऊ वाजून 12 मिनिटांनी पृथ्वीवर पाऊल ठेवले. त्यांच्या समवेत युरोपीयन अवकाश केंद्राचे लुका पॅरामिन्टो हे आंतराळवीर होते.
सोयुझ या यानातून उतरल्यानंतर मोठ्याना हासत असल्याचा व्हिडिओ रोसकॉसमॉस अवकाश केंद्राने वितरीत केला आहे. “”मी या क्षणी खूप आनंदात आहे. मी भारावून गेले आहे”, अशी प्रतिक्रिया कोच यांनी व्यक्त केली. त्या गेल्या वर्षी 14 मार्चला आंतराळात गेल्या होत्या. या व्हिडिओत कोच यांच्याजवळ पॅरामिन्टो आहेत तर स्कवोत्सव हे आंतराळवीर सफरचंद खाताना दिसत आहेत.
त्यांना घेऊन येणारे कॅप्सुल उतरताना स्थानिक कझाक नागरिकांनी पाहिले. या तीन आंतराळवीरांनी कॅप्सूलमधून बाहेर पडताच त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गराडाच घातला, असे नासाच्या रॉब नेव्हियास यांनी सांगितले. ते म्हणाले, असे दृष्य मी यापुर्वी पाहिलेच नव्हते. तेथे असणाऱ्या व्यक्तीने अभियंत्याशी सुरू असणारे संभाषण थांबवले आणि तो पहातच राहिला.
या आधी अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम नासाच्या प्रख्यात आंतराळवीर पेग्गी व्हिटसन यांच्या नावावर 2016-17 मध्ये नोंदवला आहे. त्या 289 दिवस राहिल्या होत्या. त्यांचा विक्रम मोडला त्या दिवशी अवकाशातून कोच यांनी व्हिटसन यांच्याशी संवाद साधला. “माझी नायिका’ “माझ्या मार्गदर्शक’ असे त्यांना आदराने संबोधले होते. पुढील पिढीला मार्गदर्शन करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. जेस्सीका मेर या सहाध्यायी आंतराळवीरासह अवकाशात चालण्याचा िोवक्रमही त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. महिलांसाठी योग्य आकाराचे दोन गणवेश नसल्याने त्यांचा अवकाश चालण्याचा विक्रम पुढे ढकलावा लागला होता.
तुम्हाला हवे त्यावेळी सिलींग आणि भींतीच्या मध्ये उड्या मारत राहणे फारच गंमतीशीर होते, असे त्यांनी गंमतीने म्हटले आहे. कारंगाडामधील कझाक शहर आणि जर्मनीतील कोलोग्ने येथे त्यांची वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर त्यांना नासाच्या ह्यस्टन येथील मुख्यालयाच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
नासाचे शास्त्रज्ञ मंगळावर दीर्घकाळ राहणारे आंतराळवीर पाठवण्याची योजना आखत आहेत. त्यासाठी कोच यांचा वैद्यकीय डाटा महत्वाचा ठरणार आहे.