म्यानमारमध्ये लोकशाही समर्थकांचे हत्यासत्र सुरूच

यांगोन – म्यानमारमध्ये लोकशाही समर्थकांचे हत्याकांड घडवून येण्याचे कृत्य तेथील लष्करी राजवटीकडून सुरूच असून सैन्याने 82 लोकशाही समर्थकांची गेल्या काही तासांत हत्या केल्याचे व त्यांचे मृतदेह नंतर तेथील एका बौद्ध मंदिराच्या मैदानात रचून ठेवल्याचे वृत्त आहे.

ठार झालेल्या निदर्शकांच्या संख्येवर एक संस्था लक्ष ठेवते. स्थानिक माध्यमांनी आतापर्यंत 82 जणांच्या मृत्यूची खातरजमा केली आहे. मृतांचा आकडा अजून वाढू शकतो कारण इतर प्रकरणातील मृतांचा आकडा आलेला नाही. याआधी पण सैनिकांनी 14 मार्चला राजधानीपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या यांगून शहरात शंभर जणांना ठार मारले होते.

लोकशाहीची पुन्हा स्थापना व्हावी यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या लोकांची संख्या एका खासगी संस्थेकडून दररोज केली जात असून या संघटनेने सांगितलेले आकडे विश्वासनीय असतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.