हॉलीवूडमधील दोन सेलिब्रिटी डॉग सध्या बेपत्ता झाले आहेत. या दोन्ही सेलिब्रिटी श्वानांच्या शोधासाठी कोट्यवधी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हे दोन्ही बुलडॉग असून ऑस्कर विनर पॉप स्टार लेडी गागाचे आहेत.
एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या एका लुटालुटीच्या घटनेच्या वेळी हे कुत्रे चोरीला गेले आणि यावेळी लेडी गागाच्या डॉग वॉकरला पण गोळी लागली आहे.
हे दोन्ही कुत्रे शोधून आणून देणाऱ्याला तब्बल पाच लाख डॉलर म्हणजे 3.65 कोटी रुपये बक्षीस दिले जाणार आहे. हे दोन्ही कुत्रे लेडी गागाला खूप प्रिय आहेत आणि तिच्याबरोबर अनेक वेळेला कार्यक्रमांमध्ये ते उपस्थित असत.
कोजी आणि गस्ताव अशी या कुत्र्यांची नावे आहेत. लेडी गागाचा तिसरा कुत्राही याच वेळी चोरीला गेला होता. पण पोलिसांनी त्याला शोधून काढले. आता बेपत्ता असलेल्या दोन कुत्र्यांच्या शोधासाठी भले मोठे बक्षीस जाहीर केले गेले आहे.