पुणे : कर्जत जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर एक नवखा उपक्रम राबविला आहे. आज सायंकाळी ५ वाजल्यापासून रोहित पवार हे #AskRohit. या हॅशटॅगचा वापर करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. जर तुम्हालाही आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही तुमच्या ट्विटर खात्यावरून तुमचा प्रश्न व #AskRohit. हा हॅशटॅग वावरू शकता.