Asian Games 2023 (Squash) : आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज सातवा दिवस आहे. आज टेनिस पाठोपाठ भारताला स्क्वॉश या क्रीडा प्रकारातही सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. भारताच्या पुरुष संघाने स्क्वॉशच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करत 10वे सुवर्ण जिंकले आहे.
स्क्वॉशमध्ये भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले असून 2014 नंतर प्रथमच भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत हे पदक जिंकले आहे. भारतासाठी, 25 वर्षीय अभय सिंगने अंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली आणि तणावपूर्ण परिस्थितीतही चमकदार कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील या खेळातील भारतीय संघाचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी 2014 मध्ये भारताने मलेशियाला हरवून सुवर्णपदक जिंकले होते.
अंतिम फेरीच्या तिसऱ्या सामन्यात अभय सिंगने पाकिस्तानच्या जमान नूरचा 11-7, 9-11, 7-11, 11-9, 12-10 असा पराभव करत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले.(A Glorious Gold by the Squash men’s Team! Team India defeats Pakistan 2-1in an nail-biter final) याआधीच्या सामन्यात सौरव घोषालने महंमद असीम खानचा पराभव केला होता, तर महेश माणगावकरला नासिर इक्बालविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.