Ganeshotsav 2023 – मुंबईतील लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) आज विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पारंपारिक कोळी नृत्यानंतर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुक व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी पोलिसांकडून देखील दक्षता घेतली जात आहे.
याशिवाय मुंबईच्या राजाच्या अर्थात गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. यावेळी सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याशिवाय गणपती बाप्पावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत आहे.
लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा मार्ग –
लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा मार्ग हा श्री. गणेश नगर, लालबाग- गरमखडा जंक्शन नॉर्थ बॉन्ड डॉ. बी. ए. रोडने भारतमाता जंक्शन, भारतमाता जंक्शन येथून डॉ. बी.ए. रोडने गरमखाडा जंक्शन साने गुरूजी मार्गाने चिंचपोकळी ब्रिज वरून आर्थर रोड नाका – ना. म. जोशी मार्गने बकरी अड्डा- एस. ब्रीज चौक, भाखखळा रेल्वे स्टेशन पश्चिम, घोडके चौक, अग्निशमन दला समोरून खडा पारसी जंक्शन क्लेअर रोड- – नागपाडा जंक्शन- दोन टाकी रोड- संत सेना महाराज मार्ग- सुतार गल्ली माधव बाग- व्हि.पी. रोड- ऑपेरा हाऊस- गिरगाव चौपाटी- गिरगाव असा असणार आहे.