Asian Games 2023 (Badminton) : भारताची दोनवेळची ऑलिम्पिकपदक विजेती महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला महिलांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला.
जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानी असलेल्या पीव्ही सिंधूला जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या आणि यजमान चीनच्या हे बिंजियाओ हीच्याकडून 21-16, 21-12 असा अवघ्या 47 मिनिटांत पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे सिंधूचे या स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे.
दरम्यान, पीव्ही सिंधूने 2014 इंचॉन आणि 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत अनुक्रमे कांस्य आणि रौप्य पदक जिंकले होते, मात्र यंदा पीव्ही सिंधूचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.
पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये बिंगजियाओला सरळ गेममध्ये पराभूत करून कांस्यपदक जिंकले होते, परंतु चीनच्या खेळाडूने आपल्याच मातीत विजय मिळवून बदला घेतला आणि गेल्या दोन आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांचा रंग सुधारण्याची भारतीय खेळाडूची संधी हिरावून घेतली.