हांग् चौऊ – भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पूल ‘ए’ सामन्यात आज(गुरूवारी) जपानचा 4-2 असा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने पूल ‘ए’मधील आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत.
याआधी सलामीच्या लढतीत उझबेकिस्तानचा 16-0 असा धुव्वा उडवल्यानंतर भारताच्या हॉकी संघाने मंगळवारी सिंगापूरवर 16-1 असा दणदणीत विजय साकारला होता.
भारताकङून अभिषेकने दोन (13 आणि 48 मि.) तर मनदीपने एक(24 मि.) आणि अमित रोहिदासने एक (34 मि.) गोल केला.आता जपानचा पराभव करून भारतीय पुरुष हॉकी संघाने उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ आता 30 सप्टेंबरला पाकिस्तानशी भिडणार आहे.
दरम्यान,गेल्या वेळी चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या उपांत्य फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले होते, जिथे भारताने जपानचा 5-0 ने पराभव केला होता.