FIH Olympic Qualifiers, Ranchi 2024 :- भारतीय महिला हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरू शकला नाही. एफआयएच (FIH) महिला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत तिसऱ्या स्थानाच्या लढतीत भारताला जपानकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे आवश्यक होते, परंतु ते शक्य झाले नाही. या विजयासह जपान पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
रांचीच्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शुक्रवारी (19 जानेवारी) भारत-जपान सामना झाला. या सामन्यात जपानसाठी एकमेव गोल ‘काना उराता’ हिने खेळाच्या सहाव्या मिनिटाला केला. पेनल्टी कॉर्नरवर उराता हिने हा गोल केला. भारतालाही गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण जपानच्या बचावफळीने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. या सामन्यात भारताला नऊ पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु त्याचे गोलमध्ये रूपांतरण करण्यात अपयश आले. उदिता आणि दीपिका ज्युनियरकडून खूप अपेक्षा होत्या, पण या सामन्यात दोघींची कामगिरी निरुत्साही होती.
A performance that we all can take pride in.
It just wasn’t meant to be.Full-time:
India 🇮🇳 0 – Japan 🇯🇵 1Goal Scorer:
6′ Urata Kana#HockeyIndia #IndiaKaGame #EnRouteToParis@CMO_Odisha @FIH_Hockey @IndiaSports @sports_odisha @Media_SAI @HemantSorenJMM pic.twitter.com/fT1buvb4a9— Hockey India (@TheHockeyIndia) January 19, 2024
भारतीय संघाला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला होता, परंतु त्यानंतर त्यांनी न्यूझीलंड आणि इटलीला पराभूत केले आणि गट बी मध्ये दुसरे स्थान मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने न्यूझीलंड आणि इटलीविरुद्ध खेळाच्या प्रत्येक विभागात चांगली कामगिरी केली होती, तथापि, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. भारताला उपांत्य फेरीत जर्मनीविरुद्ध 3-4 ने पराभव स्वीकारावा लागला होता. दोन्ही संघांमधील तो सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये निकाल लागला. भारताचा पराभव करून जर्मनीने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले होते. आता आणखी एका महत्त्वाच्या सामन्यातही भारताचा जपानकडून पराभव झाला.
#FIHOlympicQualifiers2024 : भारताचा शूटआऊटमध्ये पराभव, पॅरिसच्या तिकीटासाठी आज जपानशी लढत ..
चौथ्यांदा ऑलिम्पिकला जाण्याचे भंगले स्वप्न…
भारतीय महिला हॉकी संघाला चौथ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी होती. भारतीय महिला हॉकी प्रथम 1980 मध्ये मॉस्को ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली, जिथे ती चौथ्या स्थानावर राहिली. यानंतर संघाने रिओ (2016) आणि टोकियो (2020) ऑलिम्पिकमध्येही स्थान मिळविले. भारतीय संघ रिओमध्ये 12व्या आणि टोकियोमध्ये चौथ्या स्थानावर राहिली.