हांगझोऊ :- आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या सांघिक रिकर्व्ह तिरंदाजीत भारताच्या पुरुष व महिला संघांनी अनुक्रमे रजत व ब्रॉंझपदकाची कमाई केली. महिलांच्या संघात अंकिता भकट, भजन कौर व सिमरनजीत कौर यांचा समावेश होता. त्यानी व्हिएतनामचा 6-2 (56-52, 55-56, 57-50, 51-48) असा पराभव केला. व्हिएतनामने भारतीय संघाला चांगली लढत दिली मात्र, तरीही त्यांना पराभव टाळता आला नाही. महिला संघाचे या स्पर्धेच्या इतिहासातील 2010 सालानंतरचे पहिलेच पदक ठरले आहे.
🥉BRONZE GLORY FOR OUR RECURVE WOMEN🥉
🇮🇳 #TOPScheme Archers Ankita Bhakat, and #KheloIndiaAthletes Simranjeet and Bhajan Kaur clinch the Bronze medal🥉, defeating Vietnam at the #AsianGames2022🏹🥳
Proud of you all🤩 Keep Shining🌟#Cheer4India#JeetegaBharat#BharatAtAG22… pic.twitter.com/kTjWf5KxLM
— SAI Media (@Media_SAI) October 6, 2023
पुरुषांच्या गटात अव्वल खेळाडू अतानू दास, तुषार शेळके व धीरज बोम्मादेवरा यांचा समावेश होता. या संघाने बांगलादेशचा उपांत्य फेरीत 5-3 (58-51, 57-54, 56-58, 57-57) असा पराभव केला होता व अंतिम फेरी गाठली होती.
A shiny #Silver🥈from the talented trio of @ArcherAtanu , @BommadevaraD & Tushar Shelke!
The fight against 🇰🇷 went strong. Well done Boys! Many congratulations#AsianGames2022#Cheer4India#HallaBol#JeetegaBharat#BharatAtAG22 pic.twitter.com/G5avQGnbtJ
— SAI Media (@Media_SAI) October 6, 2023
अंतिम फेरीतही त्यांनी कठोर मेहनत घेतली मात्र, त्यांना कोरियाकडून 5-1 (55-60, 57-57, 55-56) असा पराभव पत्करावा लागला. पुरुष संघाचे हे रजतपदकही 2010 सालानंतरचे पहिलेच पदक ठरले आहे. यापूर्वी 2013 साली झालेल्या स्पर्धेत पुरुष संघाने रजत व महिलांनी ब्रॉंझपदक पटकावले होते.